‎+91 9404961899

sscollegeruibhar2012@gmail.com

डॉ.आंबेडकर बालविकास शिक्षण संस्था रुईभर संचालित
श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रुईभर
संलग्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन !

 

गेली ४८ वर्षे डॉ. आंबेडकर बालविकास शिक्षण संस्था, रुईभर ही ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी विशेषतः मुली बाहेरगावी राहण्याच्या अडचणीमुळे दूरवरील शहरात जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. परिणामी इच्छा असूनही पुढील शिक्षणापासून वंचित राहतात.

यास्तव आमच्या संस्थेने अथक प्रयत्नांतून उच्च शिक्षणाची सोय होण्यासाठी (ज्युनिअर कॉलेज) सन २००३ पासून सुरु केले आहे व फेब्रु. २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षेत यावर्षी घवघवीत यश मिळाले आहे.

फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षेत यावर्षी महाविद्यालयाचा निकाल (कला शाखा : ९८.००%) (विज्ञान शाखा : १००%) इतका असून १०७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह व १४४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना हि २०१२ पसून करण्यात आली. महाविद्यालयासाठी सुसज्ज इमारत आहे. तसेच ग्रंथालय, कॉम्प्युटर कक्ष, विद्यार्थिनी कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, महाविद्यालयात प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा हेतू येथे जोपासला जातो. सदर महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादशी संलग्न असून प्रवेशासाठी योग्यता व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या नियमानुसार आहे.

रुईभर व ग्रामीण परिसरामध्ये आमच्या संस्थेने शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात भरीव असे कार्य केलेले आहे, हे सर्वश्रुत आहेच.

देशाच्या विकासासाठी व जनकल्याणासाठी आपले बौद्धिक वैभव कारणी लावणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.

शिक्षणमहर्षी

श्री. सुभाष (दादा) विश्वनाथराव कोळगे

संस्थापक-अध्यक्ष

डॉ. आंबेडकर बालविकास शिक्षण संस्था, रूईभर ता.जि. धाराशिव